तामिळनाडूनचे CM स्टॅलिन यांची राष्ट्रपतींकडे मागणी, म्हणाले – ‘राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करा’

पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील 7 आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा तसेच त्यांची तात्काळ सुटका करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच तामिळनाडूतील बहुतांश राजकीय पक्ष आरोपीच्या सुटकेची मागणी करत आहेत. एवढच नाही तर तामिळ जनतेची देखील हीच इच्छा आहे. या 7 जणांनी गेल्या 30 वर्षात ब-याच यातना सहन केल्या असल्याचे स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यन नलिनी श्रीहरन, मुरुगन, संथन, एजी पेरारीवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस आणि पी. रविचंद्रन हे सात जण राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी आहेत.

दरम्यान, राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी ए.जी.पेरारीवल याची काल 30 दिवसांसाठीची सुट्टी मंजूर केली आहे. या आरोपीच्या आईच्या विनंतीवरुन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ही सुट्टी मंजूर केली आहे. आरोपी पेरारीवलन याच्या आईने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांना पत्र लिहून सुट्टी मंजूर करण्याची विनंती केली होती. पेरारीवलन कोरोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्यांच्या गटात मोडत असल्याचे कारागृहातल्या डॉक्टरांनी सांगितले होते. तर पेरारीवलनचे उपचार अद्यापही पूर्ण झाले नसल्याने त्याला उपचाराची गरज असल्याच्या कारणावरुन त्याच्या आईने सुट्टीची मागणी केली होती. त्यानुसार ही सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.