टीकेचा स्विकार न केल्यामुळं ‘नियोजन’ करण्यात सरकार चूक करतयं : RBI चे माजी गर्व्हनर रघुराम राजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. आलोचकांच्या टीकेला गांभीर्याने न घेतल्याने तसेच असहिष्णू पणामुळे सरकारला अर्थव्यवस्थेवर धोरण बनवण्यात अपयश येत आहे. जर आलोचना करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सरकारकडून फोन कडून गप्प राहण्यास सांगितले जात असेल आणि ट्रोल आर्मी त्याला ट्रोल करत असेल तर कुणीही आलोचना करणार नाही. त्यामुळे सरकारने कितीही परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न केला तरी ती झाकली जाणार नाही असेदेखील यावेळी रघुराम राजन म्हणाले.

इतिहासात रमल्याने वाढणार नाही क्षमता
राजन यांनी पुढे बोलताना म्हटले कि, आपण इतिहासातील गोष्टींमध्ये रमलो आणि विदेशी गोष्टींचा विरोध केला तर अर्थव्यवस्था कधीही वर येणार नाही. याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहेत. एका ब्लॉगमध्ये त्यांनी या संदर्भात लिहिलं आहे. इतिहास वाचणे आणि समजून घेणे नक्कीच चांगले आहे, मात्र त्यामध्ये रमून जाणे तुमची असुरक्षितता दर्शवते.

सध्याची सिस्टीम मजबूत व्हावी
राजन यांनी याविषयी बोलताना म्हटले कि, सध्या असलेल्या सिस्टिमला मजबूत करण्याची प्रक्रिया कोणत्याही कारणाने प्रभावित व्हायला नको. याआधी राजन यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली होती. सरकारने खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीस प्राधान्य द्यायला हवे असे देखील राजन यांनी त्यावेळी सांगितले होते.

स्वतःचा विचार करत आहेत देश
राजन म्हणाले कि, फायनान्शिअल सेक्टरविषयी काहीही चिंता नसून जागतिक बाजारात कमी होणाऱ्या गुंतवणुकीमुळे चिंता वाढणार आहे. तसेच आजच्या जगात देश संपूर्ण जगाचा विचार करण्याऐवजी फक्त स्वतःच्या देशाचा विचार करत आहेत.

Visit : Policenama.com