घरवापसी ! अलका लांबा काँग्रेसमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाच्या माजी आमदार अलका लांबा आज शनिवारी औपचारिकपणे कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या. यावेळी कॉंग्रेसचे दिल्ली प्रभारी पीसी चाको, चांदणी चौक जिल्हाध्यक्ष उस्मान, आदर्श नगर जिल्हाध्यक्ष जिंदल व अन्य कॉंग्रेस नेते उपस्थित होते. अलका लांबा यांनी याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.

अलका यांनी ट्विट केले की, ‘आज कॉंग्रेसच्या मुख्यालयात जाऊन दिल्ली कॉंग्रेसचे प्रभारी पीसी चाको, जिल्हा चांदणी चौक अध्यक्ष उस्मान, जिल्हा आदर्श नगर अध्यक्ष जिंदल आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे सदस्यत्व घेतले. कॉंग्रेस सदस्यत्व घेतल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे.’

एकेकाळी राहुल गांधी यांच्या विश्वासू नेत्या म्हणून त्यांची ओळख झाली होती. पण, तिकिट वाटपातील नाराजीनंतर त्यांनी काँग्रेसला राम राम करून 2013 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्या चांदणी चौक या लक्षवेधी मतदारसंघातून निवडूनही आल्या होत्या. पण, आपमध्ये त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. पक्षातील काही धोरणांबाबत त्यांचे वरिष्ठांशी मतभेद होत होते.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like