ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनला सर्फिंग करताना अपघात

सिडनी : वृत्तसंस्था 

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन शुक्रवारी क्वीन्सलँडमध्ये मुलगा जॉशसोबत सुट्टीवर गेले होते. समुद्रात तासभर सर्फिंग केल्यानंतर उसळलेल्या लाटांमुळे ते फेकले गेले. या अपघातात त्यांना जबर इजा झाली आहे. त्यांनी या अपघातात हेडनचे डोके आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून मणक्यालाही फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. एका मोठ्या अपघातातून आपण बचावलो, अशा आशयाची पोस्ट हेडनने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. समुद्रात तासभर सर्फिंग केल्यानंतर उसळलेल्या लाटांमुळे आपण फेकलो गेलो, असे हेडनने आपल्या पोस्टमध्ये सांगितले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16016483-cac8-11e8-b170-17073491fe36′]

अपघातात हेडलना मानेजवळ स्पायनल कॉर्डला फ्रॅक्चर झालं. काही लिगामेंट्सना (अस्थिबंध) दुखापत झाली, तर कपाळावरही मार बसला. एमआरआय आणि सीटी स्कॅन झाल्याचे हेडनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये म्हटले आहे. प्रकृती सुधारत असल्याचेही हेडनने चाहत्यांना सांगितले आहे.

तर, वैद्यकीय तपासणीत हेडनला फ्रॅक्चर झाल्याचं समजतं आहे, मात्र तो यामधून लवकर बरा होईल असं मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

‘हा’ असेल नरेंद्र मोदींचा नवीन मतदारसंघ..

46 वर्षांच्या मॅथ्यू हेडनने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 103 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 8 हजार 625 धावा, तर 161 वनडेमध्ये 6 हजार 133 धावा ठोकल्या आहेत.