ऑस्ट्रेलियाच्या Ex PM च्या मुलीने केला माजी खासदारावर ‘बलात्काराचा’ आरोप, म्हणाली वडीलांनी बोलण्यास अडवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान बॉब हॉक यांच्या मुलीने आरोप लावला आहे की 1980 च्या दशकात त्यांच्यावर बलात्कार झाला होता. परंतू त्यांच्या वडीलांना राजकीय कारकिर्दीवर नुकसान होऊ नये म्हणून शांत राहावे लागले. बॉब हॉक यांच्या सर्वात लहान मुलीने रोसलिन डिलन यांनी दावा केला आहे की त्यांच्या वडीलांचे निकटवर्तीय आणि माजी खासदार बिल लॅंडरयू यांनी 1980 च्या दशकात त्यांच्यावर बलात्कार केला होता.

रोसलिन डिलन यांच्या आरोपाला ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्ताच्या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयात समोर ठेवण्यात आले. त्यांनी सांगितले की हॉक लेबर पक्षाचे खासदार बिल लॅंडेरयू यांच्याद्वारे त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील दोघेही आता जिवंत नाहीत. डिलन सध्या तिच्या वडीलांच्या मिलीयन डॉलरच्या (तेथील चलनानुसार) संपत्तीवर दावा करत आहे. एका प्रतिज्ञापत्रात म्हणले आहे की सुश्री डिलन यांनी आरोप केला की जेव्हा बिल लॅंडरयू यांच्या कार्यालयात काम करत होती. तेव्हा बिलने त्यांच्यावर बलात्कार केला. तेव्हा हॉल लेबर नेतृत्व करण्याच्या तयारीत होते.

एका वृत्तानुसार डिलनचे म्हणणे आहे की त्यांच्या 1983 मध्ये तीन वेळा लैंगिक शोषण करण्यात आले. तिसऱ्यांदा जेव्हा बलात्कार झाला तेव्हा त्यांनी वडीलांना ही माहिती दिली. त्यांनी आपल्या वडीलांना सांगितले की बिल लॅंडरयू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करुयात. परंतू वडीलांनी सांगितले की, तू आता असे करु नको. मी आता कोणताही वाद ओढावून घेऊ इच्छित नाही. मी माफी मागतो परंतू आता मी लेबर पक्षांचा नेता म्हणून निवडणूक लढवत आहे.

तर त्यांच्या बहिणीने सांगितले की, त्यांचे कुटूंब या घटनेपासून परिचीत आहे. त्यांनी तेव्हा ते लोकांना सांगायला हवे होते. त्यांनी विश्वास आहे की लोकांनी त्यांना समर्थन दिले असते, परंतू याला कायदेशीर प्रक्रियेत त्यांनी याला सहभागी करुन घ्यायला नको होते. त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी सांगितले की, 1980 च्या ऑस्ट्रेलियाच्या राजकारण हॉक प्रमुख व्यक्ती होते, त्यांनी चार निवडणूका जिंकल्या होत्या.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like