अभिनेत्री मंदाना करीमीच्या ‘हॉट’ अवतारामुळे सोशलच्या तापमानात ‘वाढ’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बिग बॉस ९ची पूर्व कंटेस्टेंट आणि टेलिव्हीजन अ‍ॅक्टर मंदाना करीमीने सोशल मीडियावर आपला बोल्ड लुकमधील फोटो शेयर केला आहे. शेयर केलेल्या फोटोमध्ये मंदाना करीमी खूप सुंदर दिसते आहे. फोटोशूटमध्ये मंदानाने गोल्डन स्वि‍मसूट घातला आहे. त्यासोबत तिने हेवी जॅकेट घातले आहे.
image.png
बिग बॉस मध्ये सहभाग घेतल्यानंतर मंदानाच्या आयुष्यात अनेक बदल झाले. तिच्या आयुष्यातील झालेल्या बदलानं मध्ये तिचा बोल्ड लुक देखील सामील आहे. तिच्या या बिंधास लुकमुळे तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक देखील केले आणि तिच्यावर टीका देखील केल्या. मंदानाने प्रत्येकवेळेस ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
image.png
मंदाना फिटनेस फ्रीक आहे. ती नेहमी सोशल मीडियावर आपले वर्कआउट सेशंसचे फोटो शेयर करत असते. मंदानाने स्टार प्लसवर प्रसारित झालेली सिरीयल इश्कबाज मध्ये देखील काम केले आहे. या मध्ये तिने नैंसी मल्होत्रा ची नेगेटिव भूमिका केले होती. इश्कबाजमध्ये तिच्या भूमिकेमुळे तिचे कौतुक केले होते.
image.png
मंदनाने मार्च २०१७ मध्ये बॉयफ्रेंड गौरव गुप्ता सोबत लग्न केले. पण त्यांचे लग्न काही दिवसच टिकले. जुलै मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. टेलिव्हीजन शो बिग बॉस आणि इश्कबाजच्या व्यतिरिक्त मंदनाने ‘क्या कूल हैं हम’, मध्ये आणि ‘मैं और चार्ल्स’, ‘भाग जॉनी’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Loading...
You might also like