‘मी जग सोडून जातेय’, डिप्रेशनसोबत लढणाऱ्या अभिनेत्रीच्या पोस्टमुळं प्रचंड खळबळ ! पुढं झालं ‘असं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सुशांत सिंह राजपूतला जाऊन 1 महिना उलटला आहे. तरीही चाहते अजूनही दु:खात आहेत. त्याच्या निधनानंतर डिप्रेशनचा मुद्दाही चांगलाच चर्चेत होता. यानंतर आता डिप्रेशनसोबत लढा देणाऱ्या एका अभिनेत्रीनं अशी काही पोस्ट शेअर केली की, सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. काही मित्रांनी तर तिच्या घरी धाव घेतली. तिच्या पोस्टमुळं चांगलीच खळबळ उडाली होती.

सुदैवानं ही अभिनेत्री एकदम सुरक्षित आहे. बिग बॉस कन्नड सीजन 3 मध्ये दिसलेल्या या कन्नड अभिनेत्रीचं नाव जयश्री रमैया (Jayashree Ramaiah) आहे. फेसबकवरून पोस्ट शेअर करत जयश्रीनं सांगितलं होतं की, ती या जगाला गुड बाय करत आहे.

जयश्री आपल्या पोस्टमध्ये म्हणाली होती की, “मी जातेय. या जगाला आणि डिप्रेशनला गुड बाय.” जयश्रीच्या या पोस्टनंतर प्रचंड खळबळ उडाली. तिच्या काही मित्रांनी तर लगेच तिच्या घराकडे धाव घेतली. सुदैवानं ती सुरक्षित होती आणि तिनं ही पोस्टही डिलीट केली होती. यानंतर तिची आणखी एक पोस्ट समोर आली होती. यात ती सुरक्षित असल्याचं तिनं सांगितलं होतं.

जयश्रीची मैत्रीण व अभिनेत्री अश्विती शेट्टी हिनं सांगितलं की, “गेल्या काही दिवसांपासून जयश्री डिप्रेशनचा सामना करत आहे. ती अनेकदा म्हणाली आहे की, मला बरं वाटत नाही. मी तिला प्रत्येक वेळी धीर दिला आहे. ती कायम फोन नंबर बदलत असल्यानं तिच्या संपर्कात राहणं शक्य होत नव्हतं.”

https://www.instagram.com/p/BsZoRGmh2ze/

https://www.instagram.com/p/BsWSleDAZ8I/