भाजपचे ‘हे’ माजी आमदार करणार आज राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज शरद पवार यांच्या वाढदिवशी प्रवेश करणार आहेत. धुळ्याचे भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एप्रिल महिन्यात पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. मुंबईत आज दुपारी ते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एनसीपीमध्ये प्रवेश करत आहेत.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार अनिल गोटे यांना भाषण करुन देण्यात आले नाही. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या गोंधळामुळे गोटे यांनी काही न बोलताच मेळाव्यातून बाहेर पडावे लागले होते. महापालिका निवडणुकीत गोटे यांची आपला गट स्वतंत्रपणे उभा केला होता. त्यात त्यांना यश मिळाले नाही.

धुळ्याच्या महापौरपदावर दावा केला होता. पण त्यालाही यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर राजकीयदृष्टा ते काहीसे बाजूला पडल्यासारखे झाले होते. त्यामुळे आता राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. तेलगी याच्या मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणात अनिल गोटे हे अनेक वर्षे तुरुंगात होते. अजूनही हा खटला प्रलंबित आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

Loading...
You might also like