वाराणसीतून PM मोदींच्या निवडीविरोधात माजी जवान तेज बहादूर सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या निवडीला माजी बीएसएफ जनवा तेज बहादुर यादव यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. इलाहाबाद कोर्टाने तेज बहादुर यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर तेज बहादुर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेज बहादुर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र तेज बहादुर यांच्या उमेदवारी अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीचे असल्याचे कारण देत त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. याप्रकरणी तेज बहादुर यांनी इलाहाबाद कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, इलाहाबद कोर्टाने तेज बहादुर यांची याचीका फेटाळून लावली होती.

तेज बहादूर यांची याचिका फेटाळून लावताना इलाहाबाद कोर्टाने म्हटले होते की, तेज बहादुर हे वारणासीचे मतदार नाहीत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील उमेदवार नव्हते. याच आधारावर त्याची निवडणूक याचिका दाखल करण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. इलाहाबद कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर तेज बहादूर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.