BJP Former Minister Suicide | भाजपच्या माजी मंत्र्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – BJP Former Minister Suicide | छत्तीसगडचे भाजपचे माजी परिवहनमंत्री राजिंदरपाल सिंग भाटिया (Rajinder Pal Singh) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (BJP Former Minister Suicide ) उघडकीस आली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

तीन वेळा खुज्जी विधानसभा मतदार संघातून राजिंदरपाल सिंग भाटिया आमदार राहिले आहेत. रमण सिंह सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपद दिले होते. मात्र, त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यांना सीएसआईडीसीचे चेअरमनपद देण्यात आले होते.

मिळालेली माहिती अशी की, छुरिया येथे लहान भावासोबत राजिंदरपाल सिंग भाटिया राहत होते.
रविवारी सायंकाळी ते घरी एकटेच होते. कुटूंबातील इतर सदस्य घरी आले त्यावेळी त्यांना राजिंदरपाल गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले.
तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.
त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील (BJP Former Minister Suicide) कारण समजू शकले नाही.
मात्र, ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते,
असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमातून प्रसारित करण्यात आले होते.
दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येबाबतचा तपास सुरू केला आहे.

Web Titel :- former chhattisgarh minister rajinder pal singh bhatia found hanging at home suicide suspected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | कमी किंमतीत UAE चे ‘चलन’ घेण्याचा प्रयत्न, मिळाला धुण्याचा ‘साबण’

FB Account Cloning | Facebook वर ‘या’ नावानं फ्रेन्ड रिक्वेस्ट आली तर राहा सावध, अन्यथा बसेल मोठा फटका; जाणून घ्या

Crime News | मुंबईत गणपती विसर्जनदिनी 5 मुले बुडाली; पुण्यात इंद्रायणी नदीत 2 जण बुडाले