माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतले ‘खंडोबा’चे दर्शन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सपत्नीक जेजुरी गडावर येऊन कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले. दरवर्षी चव्हाण यांच्या परिवारातील सदस्य देवदर्शनासाठी जेजुरी गडावर येत असतात.

काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिना चव्हाण , आमदार संजय जगताप ,आमदार अमर राजूरकर , माजी मंत्री डी.बी. सावंत आदींनी जेजुरी गडावर येऊन श्री खंडोबा देवाचे दर्शन घेऊन कुलधर्म कुळाचाराप्रमाणे धार्मिक विधी करून भंडार – खोबऱ्याची उधळण केली.

जेजुरीच्या श्री मार्तड देवसंस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त ॲड. अशोक संकपाळ, विश्वस्त संदीप जगताप , पंकज निकुडे यांनी या सर्व मान्यवरांच सन्मान केला . सर्व मान्यवरांनी खंडोबादेवाची ४२ किलो वजनाची तलवार उचलून दसरा उत्सवातील तलवार स्पर्धेचे कौतुक केले.

Visit : Policenama.com