‘मी हिमालयात होते, तरीही मला ‘कोरोना’ झाला’ : उमा भारती

भोपाळ : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. हिमालयातून आल्यानंतर हलका ताप जाणवत होता आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे कोरोनाची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मी सर्व नियम पाळून देखील मला यात्रा संपवून आल्यावर 3 दिवस ताप येऊ लागला. त्यावेळी कोरोना टेस्ट करून घेतली आणि ती सकारात्मक आल्याचे भारती यांनी सांगितले आहे. सध्या त्या वंदे मातरम् कुंज इथे क्वारंटाइन सेंटरमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेईन असेही त्यांनी सांगितले आहे. 4 दिवसांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ल्यानुसार निर्णय घेईन अशी माहिती भारती यांनी दिली. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी ट्वीट करून केले आहे.