Former CM Ashok Chavan | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडण्याच्या तयारीत ? चर्चांवर स्वत:च दिलं स्पष्ट उत्तर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Former CM Ashok Chavan | राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 50 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कोसळलं. या सरकारमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप या आमदारांनी केला. मात्र, या घडामोडीपाठोपाठ आणखी एक चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. काँग्रेस नेते (Congress Leader) आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. यावर आता अशोक चव्हाण यांनी स्वत: च उत्तर दिलं आहे.

 

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची चर्चा सुरु आहे. नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरु आहे. या चर्चेवर अशोक चव्हाण यांनी खुलासा केला आहे. विधानसभेत (Assembly) बहुमत चाचणी (Majority Test) ठरावाच्या वेळी काँग्रेसचे 11 आमदार गैरहजर होते. त्यात अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासह इतर आमदारांचा समावेश होता.

 

गैरहजर आमदारांवर कारवाई होणार असे समोर येत आहे. त्यात अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र, चव्हाण यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चर्चेला काही महत्त्व नाही. असा कुठलाही निर्णय मी घेतला नाही, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं.

 

भाजपची चव्हाणांना ऑफर

नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर (Nanded MP Prataprao Chikhlikar) यांनी चव्हाणांना भाजप (BJP) प्रवेशाची ऑफर दिली.
अशोक चव्हाण यांनी बहुमत चाचणीला गैरहजर राहून एकप्रकारे भाजपला मदत केली.
तसेच बहुमत चाचणीला अशोक चव्हाण यांनी 4 आमदारांना गैरहजर ठेवले. त्यामुळे त्यांचे आभार मानणे माझे काम आहे.
अशोक चव्हाण भाजपमध्ये असल्यास त्यांचे स्वागतच करु असं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटले.

 

Web Title : – Former CM Ashok Chavan | former cm ashok chavan will leave congress disclosure made on political discussion

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा