किरीट सोमय्यांनी केलेल्या जमीन व्यवहाराच्या गौप्यस्फोटानंतर अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   रिपब्लिक टीव्हीचे ( Republic TV) पत्रकार अर्णब गोस्वामी ( Arnab Goswami) यांना अटक केल्यानंतर राजकारण रंगले आहे. अर्णब यांना अटक केल्यानंतर भाजपचे ( BJP) नेते आणि भाजप खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somayya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांच्यावर टीका केली होती. यावेळी किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक ( Anvay Naik) परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई येथील अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या.

उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी याविषयी बोलताना एखाद्या नेत्याने आणि त्याच्या कुटुंबाने कशाला प्राधान्य द्यायला हवं? विश्वार्हतेला की नफेखोरीला? सत्तेसाठी पैशाचा वापर करणाऱ्यांचा आपण फैसला करायला हवा, असे ट्विट करत म्हटले आहे. किरीट सोमय्या यांच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी हे उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते सोमय्या ?

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लपवण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये सोमय्या यांनी कागदपत्रेदेखील ट्विट केली होती. यामध्ये रायगड जिल्ह्यातील रेवदंडानजीकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवलाn ? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असा सवालदेखील सोमय्या यांनी यामध्ये विचारला होता. अमृता फडणवीस यांच्या या टीकेनंतर आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.