Ajit Jogi Heath Update : माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती गंभीर, गाणे ऐकवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि जनता कॉंग्रेस छत्तीसगडचे प्रमुख अजित जोगी यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर संदीप दवे यांच्या नेतृत्वात तज्ञ डॉक्टर आणि पथक त्यांच्या उपचारामध्ये व्यस्त आहेत. जोगी सध्या कोमात आहेत आणि त्याच्या मेंदूच्या हालचाली पूर्णपणे बंद आहेत. जोगी यांना पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी ऑडिओथेरपीचा सहारा घेतला जात आहे. त्यांचे आवडते गाणे हेडफोनच्या माध्यमातून ऐकवले जात आहे, जेणेकरून त्यांच्या मेंदूत काही हालचाल होईल. ते सध्या शहरातील नारायण हॉस्पिटलमधील जीवनरक्षक यंत्रणेवर आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्यांचा बीपी आणि नाडी मेनटेन आहे, परंतु मेंदूचे कार्य अजून ठिक नाही. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जोगी हे गेल्या चार दिवसांपासून गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. शनिवारी सकाळी गंगा चिंचेची बी त्याच्या श्वास नळीत अडकली होती. यानंतर, ते बेशुद्ध झाले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले गेले असता डॉक्टरांनी त्यांची हृदयविकाराची तपासणी केली. दरम्यान, जोगी यांच्या आरोग्यासाठी त्याच्या गावातील ग्रामस्थ प्रार्थना करीत आहेत. राज्यपालांसह अनेक मंत्री नेतेही त्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी पोहोचले आहेत. पुढील 24 तास त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.