छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन, दीर्घ काळापासून होते आजारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित जोगी यांना हृदविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी 20 दिवस त्यांच्यावर उपचार सरु होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा अमित जोगी यांनी ट्विट करून दिली आहे.

अमित जोगी यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 20 वर्षीय युवा छत्तीसगड राज्याच्या डोक्यावरून त्याच्या वडिलांचे छत्र हरपले आहे. केवळ मीच नाही तर संपूर्ण छत्तीसगढने नेता नाही तर आपल्या वडीलांना गमावले आहे. अजित जोगी आपल्या अडीच कोटी लोकांना सोडून देवापाशी निघून गेले. गाव-गरीबांचा आधार, छत्तीसगडचा लाडका आज आपल्यापासून खूप दूर निघून गेला.

अजित जोगी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. नोकरशाह पासून राजनेता बनलेले अजित जोगी हे छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री राहीले आहेत. मध्य प्रदेशचे छत्तीसगडमध्ये विभाजन केल्यानंतर ते नोव्हेंबर 2000 ते नोव्हेंबर 2003 पर्यंत मुख्यमंत्री राहीले. जोगी यांनी 2016 मध्ये काँग्रेसला सडचिठ्ठी देऊन आपली जनता काँग्रेस छत्तीसगढ (जे) या पक्षाची स्थापना केली होती.