हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुड्डा प्रचंड अडचणीत, ED कडून 30 कोटींचे 14 प्लॉट जप्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणाच्या शहर विकास प्रधिकरणाच्या पंचकूलामध्ये औद्योगिक जागेच्या वाटपासंबंधित प्रकरणी ईडीने माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्याबाजूचा फास आवळला आहे. सक्तवसुली संचलनालयाने हुड्डा सरकार सत्तेत असताना वाटप केलेले 14 प्लॉट मिळून त्याची किंमत 30 कोटी 34 लाख रुपये असल्याचे सांगितले.

प्लॉट वाटपाच्या घोटाळ्यासंबंधित ईडीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. ही कारवाई मनी लॉड्रिंग कायद्याअंतर्गत केली आहे. माजी मुख्यमंत्री हुड्डा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 2011 साली प्लॉट त्यांच्या नजीकच्यांना वाटप केले होते. या जमिनी बाजार मूल्यांपेक्षा कवडीमोल भावात देण्यात आल्या. एवढेच नाही तर या जमीन गैरव्यवहारात असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील कारवाई केली असल्याची माहिती आहे.

हरियाणा शहर विकास प्रधिकरणामध्ये 2011 मध्ये वाटपासाठी प्लॉट उपलब्ध होते. वाटपाचे मूल्य अत्यंत कमी होते. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला निर्देश दिले की या प्रकारच्या वाटपात निष्पक्ष आणि पारदर्शक मानके बनवण्यात यावेत.

ईडीच्या मते अर्ज करण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर 18 दिवसानंतर वाटपाचे मानक बदलण्यात आले. असे तेव्हा झाले जेव्हा अर्जाचे आकडे हुड्डा यांच्याकडे पोहचले. ईडीने आरोप केला की एक समिती नेमून त्याचे आधिकार वाढवून निवडण्यात आलेल्या अर्जाच्या बाजूने मानकात फेरबदल केले.

आरोग्यविषयक वृत्त –