निर्भया केस ! न्याय मिळण्यास उशीर होत असल्यानं जनतेकडून ‘एन्काऊंटर’ झाल्यास आनंद व्यक्त, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयांच्या दोषींना फाशी देण्यास उशीर होत आहे. यावर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशवर सुनावणीदरम्यान शिवराज सिंह चौहन यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत अशा गुन्हेगारांसाठी कायद्यात बदल करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच निर्भया प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी करत सांगितले की, असे कायदेशीर डाव पेच सुरु असतात त्यामुळे लोक हैदराबाद एन्काऊंटर खुश आहेत.

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर –
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये चार आरोपींनी एका वेटनरी डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता आणि तिला जीवंत जाळण्यात आले होते. हैदराबादच्या प्रकरणानंतर देशात संपाताचे वातावरण होते. लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिस आणि आरोपींमध्ये झालेल्या कथित चकमकीत आरोपांचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. हा एन्काऊंटर तेव्हा झाला जेव्हा आरोपींना घटनास्थळी तपासासाठी नेण्यात आले होते.

या ठिकाणी आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्याचा कथित प्रकार घडला होता, या चकमकी दरम्यान आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. एकीकडे देशभरातील हैदराबादमधील दिक्षाला न्याय दिल्याबद्दल जनमानसातून पोलिसांचे कौतूक होत होते तर दुसरीकडे मानवधिकार आयोग आणि न्यायालयाने पोलिसांच्या या कृत्यावर प्रश्न उपस्थित केला होते.

फेसबुक पेज लाईक करा