Ashok Kamble | भररस्त्यात पहिल्या पत्नीचा विनयभंग, माजी नगरसेवकाला अटक; दुस-या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल

सांगली न्यूज (Sangli News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) –  भर रस्त्यात पहिल्या पत्नीला गाठून तिला मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंग (first wife’s molestation) केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी युवा आघाडीचे जिल्हाअध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे (Ashok Kamble) यांना मिरज पोलिसांनी (Miraj police) बेड्या ठोकल्या आहेत. 2 आठवडयापूर्वी पहिल्या पत्नीच्या तक्रारीनंतर कांबळे आणि त्याच्या दुस-या पत्नीच्या विरोधात मिरज पोलीसात विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. former corporator ashok kamble arrested for first wifes molestation in sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक अशोक कांबळे (Ashok Kamble) यांची पहिली पत्नी काही दिवसांपूर्वी भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती.
त्यावेळी अशोक कांबळे हे एका महिलेसोबत तिला दिसले. त्यावेळी 4 महिने घरी आला नाहीत,
घरी चला असे पहिल्या पत्नीने कांबळेंना दटावले.
त्यावेळी कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
आपले कपडे फाडल्याची तक्रारही पहिल्या पत्नीने कांबळे आणि दुसऱ्या पत्नीविरोधात केली होती.
याबाबत मिरज शहर पोलिसात (Miraj City Police) अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दोन आठवड्यांनंतर पोलिसांनी कांबळेंना अटक केली आहे.

Web Title : former corporator ashok kamble arrested for first wifes molestation in sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | मोदी सरकारचा नोकारदारांना मोठा दिलासा ! आता मार्च 2022 पर्यंत तुमच्या सॅलरीतून कपात नाही होणार PF चे पैसे