माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माजी नगरसेवक (Former Corporator) उदयकांत राणोजी आंदेकर (Udyakant andekar) यांचे अल्पशा आजाराने जहांगीर रुग्णालयात निधन (Passe Away) झाले. ते 52 वर्षांचे होते. शिवभक्त बंडू आण्णा आंदेकर यांचे धाकटे बंधू नरसेविका लक्ष्मीताई आंदेकर यांचे ते पती होते.

उदयकांत आंदेकर हे सुमारे 15 वर्षे महानगरपालिकेत सदस्य म्हणून कार्यरत होते. राजकीय प्रवासात अपक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. समजामध्ये एक दानशूर व्यक्ती म्हणू परिचित होते. विशेषत: दिन दलित व दुर्बल घटकांना ते सतत आर्थिक सहाय्य करत होते. अल्पावधीतच त्यांनी बांधकाम व्यवसायात नावलौकिक मिळवले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या हितचिंतकांनी स्मशानभूमी येथे धाव घेतली. मात्र, प्रशासकीय कारणास्तव स्मशानभूमीत जाण्यासाठी पोलिसांनी त्यांना मज्जव केला. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली. नाना पेठेतील व्यापारी व व्यावसायिकांनी आंदेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वयंपूर्णपणे दुकाने बंद करुन शोक व्यक्त केला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन मुली, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. विद्यमान नगरसेवक वनराज आंदेकर यांचे ते चुलते होते. तसेच नगरसेविका स्व. राजश्री आंदेकर यांचे ते दीर होते.