Pune : माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

येरवडा: पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष भीमराव सुखदेव खरात (वय 65) यांचे बुधवारी (दि. 26) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

2007 मध्ये ते विमाननगर प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत निवडून गेले होते. येरवडा, नागपूर चाळ, वडगावशेरी परिसरातील विविध आंबेडकरी संस्था संघटनाशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते बुद्धम् खरात व रमेश खरात यांचे ज्येष्ठ बंधू होते.