माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भाजपची उमेदवारी जाहीर ; ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढविणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – भारतीय टीमचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपने आज दिल्लीतील दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये गौतम गंभीर यांना पूर्व दिल्लीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नवी दिल्ली संसदीय मतदारसंघातून मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

केंदीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरचा भाजप मध्ये प्रवेश झाला. आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटर असलेला गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात बॅटींग करताना दिसणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1120356503112884224