राज्यपाल पदावर ‘या’ माजी प्रसिद्ध ‘क्रिकेटपटू’ ची नेमणूक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यपाल काय असतात हे संपूर्ण राज्याने राज्यातील राजकीय घडामोडींवरुन पाहिले. महाराष्ट्राचे राज्यपाल हे संपूर्ण देशात चर्चेचे विषय ठरले. शक्यतो राज्यपाल पदावर माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. पण आता राज्यपाल पदावर चक्क माजी क्रिकेटपटूची नेमणूक करण्यात आला आहे. अनेक देशात तसे बरेच खेळाडू राजकारणात सक्रीय दिसतात. बऱ्याच क्रिडा संघटनांवर राजकारणी बसलेले आपण पाहिले आहेत. परंतू राज्यपाल म्हणून क्रिकेटपटूची निवड होणे हे जगाच्या इतिहासात कदाचितच होत असेल.

आता राज्यपाल पद हे चर्चेत असताना एका माजी महान क्रिकेटपटूची निवड राज्यपाल पदावर झाली आहे. या क्रिकेटपटूने देशाचे नेतृत्व करताना आपल्या संघाला बरेच विजय मिळवून दिले आहेत. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाडूचे नाव सन्मानाने घेतले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळण्याचा विश्वविक्रम देखील याच खेळाडूच्या नावे आहे. हा खेळाडू आहे माजी महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन.

श्रीलंकेचा हा महान खेळाडू आता राज्यपाल झाला आहे. मुरलीधरनकडे श्रीलंकेतील नॉर्दन प्रोव्हिन्सचे राज्यपाल पद देण्यात आले आहे.

Visit : Policenama.com