दाऊद इब्राहिमच्या साथीदाराचा मुंबईत मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हृदयविकाराने आजारी असणारा दाऊद इब्राहिमचा साथीदार शकील अहमद शेख याचा रविवारी रात्री मृत्यू झाला आहे. ‘लंबू शकील’ नावाने ओळखला जाणारा दाऊद इब्राहिमचा साथीदार शकील अहमद शेख १९९० च्या दशकात दाऊदसाठी तस्करी आणि हवालाचे काम करत होता. मुंबईतील जसलोक रुग्णालयात हृयविकाराने त्याचा रविवारी रात्री मृत्यू झाला आहे.

छोट्या शकील एवढीच ‘डी’ कंपनीत दहशत असणारा ‘लंबू शकील’ हा दाऊदचा अत्यंत विश्वासू साथीदार होता. काही दिवसापासून हृदयाचा आजार झाल्यामुळे त्याला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर जसलोक रुग्णालयात त्याने शेवटचा श्वास घेतला. दाऊदच्या टोळीमध्ये सोन्याची तस्करी आणि शास्त्रास्त्रे पोहचवण्याचे काम लंबू शकील करत होता.

‘लंबू शकील’ हा काही वर्षांपूर्वी देशाबाहेर फरार झाला होता. त्याने हवाला रॅकेट देखील उभा केले होते. २००३ साली दुबईच्या सरकारने त्याला भारताकडे हस्तांतरित केले. सध्या तो दक्षिण मुंबईमधील बोहरी मोहल्ला येथे पत्नी आणि आई वडिलांसोबत राहत होता.