दिल्‍लीच्या सलग १५ वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या शिला दिक्षीत यांचे निधन

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्‍लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांचे दिल्‍ली येथे निधन झाले आहे. त्या ८१ वर्षाच्या होत्या.

शिला दिक्षीत यांचा जन्म ३१ मार्च १९३८ रोजी झाला. सन १९९८ ते सन २०१३ दरम्यान त्या सलग १५ वर्षे मुख्यमंत्री होत्या. डिसेंबर २०१३ मध्ये दिल्‍ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर त्यांची केंद्रातील युपीए सरकारनं केरळच्या राज्यपालपदी नियुक्‍ती केली होती.

सन २०१७ मध्ये उत्‍तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी माघार घेतली. १० जानेवारी २०१९ रोजी त्यांना दिल्‍ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून काँग्रेसकडून नेमण्यात आलं होते. आज (शनिवार) शिला दिक्षीत यांचे निधन झाले आहे.