माजी उपमहापौर आसवानी, माजी नगरसेवक टाक, सोनकर यांच्यासह 5 जणांना 5 दिवस पोलीस कोठडी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी दुपारी पिंपरी येथे तुफान हाणामारी झाली. यामध्ये शिवसेनेचे दोन पदाधिकारी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पिंपरी पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे जावई बबलू सोनकर यांच्यासह दोन्ही गटातील पाच जणांना अटक केली आहे. तसेच सोनकर याच्या गाडीतून दोन पिस्तुल आणि 11 काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या पाचही जनाना आज पिंपरी न्यायालयात हजर केले असता सर्वाना 27 ऑक्टोबर प्रयत्न पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Arrest

माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी (५१, रा. पिंपरी) आणि प्रशांत बाबू मंदु (34, रा. पिंपरी), बबलू सोनकर (४०, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी), जितू मंगतानी आणि लच्छू बुलाणी (५५) या तिघांना अटक केली आहे.

अभिनव सुरेंद्रकुमार सिंग (३०, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) आणि डब्बू आसवानी यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिल्या आहेत.

सिंग याच्या तक्रारीवरून हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी (५१, रा. पिंपरी) आणि प्रशांत बाबू मंदु (34, रा. पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिनव सिंग हे बबलू सोनकर यांच्या गाडीचे चालक आहेत. बबलू सोनकर यांचे सासरे गौतम चाबुकस्वार हे विधानसभा निवडणुकीकरिता पिंपरी मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

सोनकर व त्यांचे कार्यकर्ते पिंपरी परिसरात फिरत होते. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सोनकर हे आसवानी यांच्या घराजवळून जात होते. त्यावेळी आसवानी व त्यांच्या साथीदारांनी सोनकर यांची मोटार अडवली. कार्यकर्ते अनिल पारचा, उमाशंकर राजभरव आणि फिर्यादी यांना रस्त्यात अडवून लाकडी बांबू, सिमेंट गट्टू यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर बाबर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

डब्बू आसवानी यांनी दिलेल्या फिर्याद नुसार बबलू सोनकर (४०, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी), जितु मंगतानी आणि लच्छू बुलाणी (५५) या तिघांना अटक केली आहे. तर अरुण टाक (४०), अनिल पारछा (३५, सर्व रा. पिंपरी) तसेच बबलू सोनकर यांचे तीन बॉडीगार्ड व इतर साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून ते फरार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन पिस्तुल, ११ जिवंत काडतुसे आणि इनोव्हा मोटार जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी आरोपी हे बेकायदा जमाव जमवून फिर्यादी आसवानी यांच्या घराजवळ आले. त्यावेळी आरोपी अरुण टाक, दीपक टाक यांनी आसवानी यांना धरले. “बबलू इसको खलास कर दे,” असे म्हणाले.

सोनकर यांनी आसवानी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील पिस्तुल आसवानी यांच्या डोक्याला लावली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी जितू मंगतानी यांनी त्याच्याकडील पिस्तूल कार्यकर्त्यांना दाखवून कोणी मध्ये पडल्यास एकेकाला खल्लास करीन, असे मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. आसवानी यांना जबरदस्तीने मोटारीत बसवण्याचा प्रयत्न केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दोन्ही गटातील अटक केलेल्या पाच जनाणा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायधिशांनी पाच दिवसांची कोठडी सुनावली. दरम्यान या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. यामुळे न्यायालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

Visit : Policenama.com