पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Former DGP Vasant Saraf Passes Away | महाराष्ट्र राज्य स्थापन होण्याआधी तत्कालीन द्वैभाषिक राज्याच्या पोलीस सेवेत रुजू झालेले आणि राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक वसंत केशव सराफ यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. कर्वे रोडवरील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसंत सराफ यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बझार येथे झाला. वसंत सराफ यांचे वडिल ही पोलीस खात्यात नोकरीस होते. ते पोलीस उपअधीक्षक या पदावरुन निवृत्त झाले. वसंत सराफ यांनी १९५६ मध्ये गणित विषयात एम़ एस्सी पदवी मिळविली. त्यानंतर भारतीय प्रशासन सेवा परीक्षेत पहिला वर्ग मिळवून ते उत्तीर्ण झाले. पोलीस प्रशिक्षणानंतर त्यांची १९५८ मध्ये उपसहाय्यक अधीक्षक म्हणून पहिली नियुक्ती सुरत येथे झाली. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर सराफ महाराष्ट पोलीस सेवेचा घटक झाले. १९६६ मध्ये त्यांची केंद्रीय गुप्तचर संस्थेत अधीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीवर बदली झाली. १९७१ मध्ये त्यांना संशोधन आणि विश्लेषण शाखेत (रॉ)मध्ये नियुक्ती मिळाली. सीआयडीने महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९६८ मध्ये ते सीआयडीचे आयुक्त झाले. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिल्यावर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळाली. १ जानेवारी १९९० रोजी ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले. ऑगस्ट १९९२ ला ते निवृत्त झाले.(Former DGP Vasant Saraf Passes Away)
निवृत्तीनंतर त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धचा संशोधन अहवाल तयार करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. राज्य पोलीस दलांच्या अगदी गावपातळीपर्यंतच्या पोलीस स्टेशनात आवश्यक त्या संख्येत मनुष्यबळ कसं पुरवावं याचा सांख्यिकी आलेख त्यांनी तयार केला होता. आज गुजरातमध्ये या अहवालाच्या आधारे मनुष्यबळ कार्यरत आहे. शासनातर्फे पुण्यात स्थापन झालेल्या पोलीस संशोधन केंद्राचे ते पहिले मानद संचालक होते. १९७४ मध्ये त्यांना पोलीस पदक मिळाले. १९८६ ला त्यांना विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa