माजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे रविवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभुमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

मिसार हे सन 1958 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. पोलिस महासंचालक म्हणून ते निवृत्‍त झाले. सन 1975, 1986 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. ते पुण्याचे पोलिस आयुक्‍त देखील होते. अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून भास्करराव मिसार यांची ओळख होती. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या मिसार यांचं रविवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते औंध परिसरात रहावयास होते.

आरोग्यविषयक वृत्त –