असा आहे जेटलींचा परिवार, मुलगा-मुलगी दोघेही वकिली क्षेत्रात

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारताचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेता अरुण जेटली हे मागच्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आज दुपारी ठीक १२.०७ वाजता त्यांचे निधन झाले. ते कायम एक प्रभावी राजकारणी, एक कुशल नेता तसेच एक प्रभावी विधिज्ञ म्हणून लोकांच्या कायम लक्षात राहतील. भारतीय राजकारणात त्यांनी आपली अमिट छाप सोडली आहे. ते लोकांच्या कायम स्मरणात राहतील.

दिवंगत अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महाराज किशन जेटली असून ते एक वकील होते. तर त्यांच्या आईचे नाव रतन प्रभा जेटली असे आहे.

जेटली यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील सेंट झेवियर्स मधून झाले असून त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्रसिद्ध अशा श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि त्यांनतर दिल्ली विश्व् विद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली.

वकिली क्षेत्रात हि तिसरी पिढी

जेटली यांच्या पत्नीचे नाव संगीता असून, त्यांचा १९८२ साली अरुण जेटली यांच्या सोबत विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव रोहन आहे आणि त्यांच्या मुलीचे नाव सोनाली असे आहे. जेटली यांची मुलगी आणि मुलगा हे दोघेही आपल्या वडिलांसारखे वकील आहेत. वकिली क्षेत्रात ही त्यांची तिसरी पिढी आहे.

मुलीच्या लग्नाची झाली होती मोठी चर्चा

अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली हिचे २०१५ मध्ये एक व्यवसायिक तसेच वकील असलेल्या जयेश बक्षिशी यांच्याशी विवाह झाला तेव्हा. तेव्हा हा विवाह चांगलाच चर्चिला गेला होता. त्याचे कारण असे होते कि, त्यांच्या लग्नात शाहरुख खानसोबत चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते, अभिनेत्री उपस्थित होते.

मुलगा रोहन काय करतो

जेटली यांचा मुलगा रोहन जेटली हा सुद्धा आपल्या वडिलांसारखा वकीलच आहे. त्याचे प्रारंभीक शिक्षण आर. के. पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कुल मधून झाले आहे. त्यानंतर त्यांनी एमिटी लॉ स्कुल मांडून वकिलीची पदवी प्राप्त केली. आणि न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदव्युत्तर पदवी संपादन केली. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१४ साली ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्यत्व स्वीकारले आणि २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like