अरूण जेटली होते ‘या’ दिग्गज कॉंग्रेसच्या माजी खासदाराचे ‘जावई’, लग्नाला इंदिरा गांधी यांची ‘हजेरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या जगाला निरोप दिला आहे. जेटली यांच्या निधनाने केवळ भाजपच नाही. तर सर्वच राजकीय पक्षांनी दुःख व्यक्त केले आहे. जेटली यांच्या व्यक्तिमत्त्वात असा खास गुण होता की, त्याचे मित्र जवळजवळ प्रत्येक पार्टीत होते. त्यांचे राजकीय विरोधक, संसदेत त्याच्याशी जोरदारपणे वाद घालणारे नेतेही त्यांना आपला एक साथीदार मानत जे गरजेच्या वेळी असलेले मतभेद बाजूला ठेऊन मदत करत.

काश्मीरचा जमाई बाबू :

जेटली यांचे इतर पक्षांशी असलेले नाते केवळ राजकीय नव्हते तर कौटुंबिक देखील होते. त्यांचे लग्नही कॉंग्रेसच्या एका शक्तिशाली नेत्याच्या मुलीशी झाले होते. जेटली हे कॉंग्रेसचे माजी खासदार आणि जम्मू-काश्मीरचे मंत्री गिरधारी लाल डोगरा यांचे जावई होते. २४ मे १९८२ रोजी डोगरा यांची मुलगी संगीताशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांचे सासर जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमधील पैया गावी आहे. या लग्नामुळे जेटली यांना काश्मीरचा जमाई बाबू म्हणूनही ओळखले जात असे.

जेटलींच्या लग्नात भाजपाचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी उपस्थित होतेच, तर तत्कालीन पंतप्रधान आणि कट्टर राजकीय विरोधक इंदिरा गांधीदेखील या नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या. या वेळी जेटली राजकारणात येऊन काही वर्षेच झाली होती असे असूनही, या लग्नात भारतीय राजकारणात त्या काळातील प्रमुख व्यक्तींचा समावेश होता.

विशेष म्हणजे गिरधारी लाल डोगरा हे स्वातंत्र्यापासून १९७५ पर्यंत जम्मू-काश्मीरचे अर्थमंत्री होते. ते जम्मू येथील उधमपूरमधील कॉंग्रेसचे खासदारही होते. इंदिरा गांधींना एकदा त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनवायचे होते. परंतु डोगरा यासाठी तयार नव्हते. १९८७ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी त्यांचे चरित्र ‘पीपल्समॅन’ चे अनावरण केले. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवास उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –