कौतुकास्पद ! अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांनी नाकारली पेंशन :’या’ कुटुंबियांना पैसे देण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्यानंतर त्यांना मिळणारी पेन्शन त्यांच्या कुटुंबीयाने दान केली आहे. त्यांच्या पत्नींनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यासंबंधी विंनती केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे त्या कर्मचाऱ्यांना हि पेन्शनची रक्कम देण्यात यावी असे त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. पेंशनच्या रूपात राजकीय नेत्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 लाख रुपये मिळतात.

अरुण जेटली यांच्या कुटूंबात पत्नी संगीता जेटली यांच्याबरोबरच मुलगी सोनाली आणि मुलगा रोहन आहेत. त्यांची दोन्ही मुले वकीलच आहे. वकिलीबरोबरच जेटली हे दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील होते.

कधी झाले जेटलींचे निधन
माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले होते. आजारपणामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीत देखील सहभाग घेतला नव्हता.

किती पेन्शन मिळते खासदारांना
2010 मध्ये झालेल्या नवीन विधेयकानुसार माजी खासदारांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळत असते. तसेच प्रत्येक वर्षी त्यामध्ये दीड हजार रुपयांची वाढ देखील होत असते. तसेच माजी खासदारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला देखील पेन्शनची अर्धी रक्कम मिळत असते.

Visit : Policenama.com