माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांच्या काही सभा ‘रद्द’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील काही सभा रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी होणाऱ्या नियोजित सभा होतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस नगर जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यावर होते. अकोले, संगमनेर, राहुरी, नगर, पाथर्डी, जामखेड या ठिकाणी सभा होणार होत्या. फडणवीस हे नगरमध्ये मुक्कामी राहणार होते. परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा नगर जिल्ह्यातील रविवारचा दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे अकोले, संगमनेर, राहुरी येथील सभा रद्द करण्यात आल्या आहेत. नगर येथील सभाही रद्द होऊ शकते. पाथर्डी व जामखेड येथील नियोजित सभा होतील. फक्त नगरमधील सभेबाबत संभ्रम कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरू होती. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे स्वतः नियोजनावर लक्ष ठेवून होते. नगर शहरात महापालिकेने अतिक्रमणे काढून रस्त्याची साफसफाई केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like