माजी अर्थ सचिव राजीव कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, अशोक लवासा यांच्या जागी नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थ सचिव राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते अशोक लवासा यांची जागा घेतील. कायदा मंत्रालयाने शुक्रवारी रात्री अधिसूचना काढून ही माहिती दिली.

राजीव कुमार विद्यमान निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची जागा घेतील, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. 31 ऑगस्ट रोजी ते पदभारमुक्त होतील. अशोक लवासा उपाध्यक्ष पदासाठी आशियाई विकास बँकेत रुजू होणार आहेत. राजीव कुमार हे 1984 बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.

कायदा मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, “राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर राष्ट्रपती खूश आहेत. अशोक लवासाचा राजीनामा लागू झाल्यापासून निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती प्रभावी होईल.”