CAA च्या विरोधात PAK च्या माजी गृहमंत्र्यानं मिया खलिफाला दिला ‘आशिर्वाद’, झाले ट्रोल

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानी नेते आणि मंत्र्यांमध्ये अजूनही डिजिटल साक्षरतेचा अभाव दिसून येत आहे. यामुळे इम्रान सरकारमधील मंत्री सतत ट्रोल होत असून त्यांची फजिती होत आहे. विशेष म्हणजे भारताशी संबंधीत एखादे प्रकरण समोर येते तेव्हा कोणतेही तथ्य तपासण्याची तसदी ते घेत नाहीत. सध्याचा प्रकार सुद्धा काहीसा असाच आहे. मात्र, यावेळेस इम्रान खान सरकारमधील मंत्री नव्हे, तर यापूर्वीच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले रहमान मलिक यांनी भारतविरोधात आंधळे होत, असे काही केले आहे की त्यामुळे त्यांची फजिती झाली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात नागरिकत्व संशोधन कायदा मंजूर झाल्यानंतर पाकिस्तान सतत भारतावर टीका करत आहे. दरम्यान, भारताने हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे पाकला सुनावले आहे. याच कायद्यावरून भारतावर निशाणा साधण्याच्या प्रयत्नात पाक स्वत: त्यांच्याच लोकांच्या निशाण्यावर आले आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानातील पत्रकारांनीही या बोलघेवड्या नेत्यांना आरसा दाखवला आहे.

आशीर्वाद दिला आणि नंतर…
पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मिलक यांनी माजी पॉर्न स्टार मिया खलीफा हिला भारतीय आदोलनकर्ती समजून एक ट्विट केले आणि तिला आशीर्वाद दिले. अक्षय नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले – भारतीय फिल्मी दुनियेतील प्रसिद्ध महिला, बुरखा परिधान करून या नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करत आहेत. या ट्विटला उत्तर देताना रहमान मलिकने लिहिले – देवाने त्यांना आशीर्वाद द्यावेत.

पण, जेव्हा यूजरच्या ट्विटचे सत्य रहमान यांना समजले तेव्हा त्यांनी आशीर्वाद देणारे ट्विट डिलीट केले. परंतु, त्यानंतर आपला राग काढण्यासाठी त्यांनी आणखी एक ट्विट केले. यात त्यांनी लिहिले की, अनेक भारतीय सेक्स वर्कर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान केले आहे. तुम्ही त्यांनाही ट्रोल करणार का? यानंतरही लोक थांबले नाहीत, त्यांनी रहमान यांना यथेच्छ ट्रोल केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मूगाच्या डाळीचे ‘हे’ आहेत ४ आरोग्यदायी फायदे !
डिप्रेशनची ‘ही’ ५ लक्षणे जाणून घ्या, दुर्लक्ष केल्यास जाल मरणाच्या दारात
‘हे’ फळ टिकवते तारूण्य ! नियमित सेवन केल्याने होतात ‘हे’ ११ फायदे
अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा ‘हे’ ७ सोपे उपाय
चिंचेच्या पानांचे ‘हे’ आहेत ८ फायदे ! जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दूध कधी प्यावे ? ‘या’ ९ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा