खुलासा ! नोटाबंदीच्या काळात भारतीय वायुसेनेनं मोदी सरकारला केली होती ‘अशी’ मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वायुसेनेचे माजी एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ म्हणाले आहेत की २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर भारतीय वायुसेनेनं देशातील विविध भागात ६२५ टन नवीन चलन पोहोचवले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांना अवैध घोषित केले होते.

शनिवारी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईद्वारा आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात बी.एस. धानोआ म्हणाले, नोटबंदी झाली तेव्हा वायुसेनेने तुम्हाला पैसे पाठविण्याचे काम केले. २० किलोच्या बॅगमध्ये जर एक कोटी रुपये येत असतील तर मी सांगू नाही शकत की किती कोटींची मदत आम्ही केली.

धनोआ यांच्या एका प्रेझेंटेशनच्या स्लाइडमध्ये दाखवण्यात आले की नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर देशाच्या सेवेअंतर्गत वायुसेनेने ३३ अभियान चालवले आणि ६२५ टन चलनाचा माल पाठविला. धानोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत हवाई दलाचे प्रमुख होते.

टेकफेस्ट कार्यक्रमादरम्यान त्यांनी राफेल खरेदी करारावरील वादाचा उल्लेखही केला आणि असे म्हटले की अशा वादांमुळे संरक्षण सामुग्री खरेदीची प्रक्रिया हळू होत जाते. याचा परिणाम सैन्याच्या क्षमतेवर देखील होतो.

ते म्हणाले, बोफोर्स डील (Bofors Deal) राजीव गांधी सरकारच्या काळात देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली होती, परंतु बोफोर्स तोफ ही तेव्हा चांगल्या अवस्थेत होती. त्यांनी असेही म्हटले आहे की, गेल्या वर्षी बालाकोट कारवाईनंतर भारत-पाकिस्तानच्या घडामोडी दरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग -२१ ऐवजी राफेल वर उड्डाण केले असते तर आज चित्र वेगळे राहिले असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/