100 निवृत्त अधिकाऱ्यांचे पीएम मोदी यांना पत्र, PM केअर्स फंडाबाबत उपस्थित केले प्रश्न

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 100 माजी नागरी सेवा अधिकाऱ्यांनी एक खुले पत्र लिहिले आहे. अधिकाऱ्यांच्या या गटाने आपल्या खुल्या पत्रात पंतप्रधान केअर्स फंडच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हंटले कि, “पब्लिक अकाऊंटेब्लिटीचा स्तर कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान केअर्स फंडामध्ये (Prime Care Fund)  पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची गडबड रोखण्यासाठी निधीमध्ये योगदान देणारे व त्यावरील खर्च होणारे आकडे सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. “माजी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांच्या गटाने आपल्या पत्रात लिहिले कि,” आम्ही सर्व कोरोना साथीच्या आजाराने बाधित झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी बनविण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडावर (Prime Care Fund)  आणि त्यातील वादविवादावर सतत नजर ठेवून आहोत. ज्या उद्देशाने हा निधी तयार केला गेला आणि ज्याप्रकारे तो चालविला जात आहे, या दोन गोष्टी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत . ”

पत्रात पुढे असेही लिहिले की, ‘पंतप्रधानांशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता ठेवून पंतप्रधानपदाची विश्वासार्हता आणि सन्मान राखणे आवश्यक आहे’. पंतप्रधानांच्या नावे लिहिलेल्या या पत्रावर माजी आयएएस अधिकारी- अनिता अग्निहोत्री, एस.पी. अ‍ॅम्ब्रोस, शरद बेहर, सज्जाद हसन, हर्ष मंदर, पी. जॉय ओमान, अरुणा रॉय, माजी मुत्सद्दी मधु भादुरी, केपी फॅबियन, देब मुखर्जी, सुजाता सिंग यांच्यासह माजी आयपीएस अधिकारी- ए.एस. दुलत , पी.जी.जे. नेम्पुथिरी आणि ज्युलिओ रिबेरो यांनी आपल्या स्वाक्षऱ्या केल्या. कोरोना साथीच्या आजाराने भारताला प्रवेश केल्यानंतर मार्च 2020 मध्ये केंद्राने ‘पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत (पीएम-केअर्स ) फंड’ मार्च 2020 मध्ये सुरू केला. ज्याचे उद्देश आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित लोकांची मदत घेणे आणि पीडित व्यक्तींना दिलासा देणे हा आहे.