महेंद्र सिंह धोनीनं घेतलाय ‘निवृत्ती’चा निर्णय, केवळ घोषणाच बाकी – रिपोट्रर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीवरून अनेक जण बोलत आहे. मागील वर्षी इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवण्यात गेलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत धोनीने शेवटची मॅच भारताकडून खेळली होती. सेमीफायनलचा सामना न्यझिलंडविरुद्ध खेळवण्यात आला होता. विश्वचषकातील हा सामना धोनीचा शेवटचा सामना ठरू शकतो.

सुत्रांच्या माहितीनुसार, धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एका क्रीडा वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, धोनीने अधिकृतपणे निवृतीबाबत बीसीसीआय सोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. मात्र, आपल्या जवळच्या मित्रांकडे त्याने निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. वेळ आल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करणार आहे.

वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, धोनीच्या निवृत्तीची बातमी सध्यातरी येणार नाही. कारण आयपीएलमध्ये आपण फॉर्ममध्ये असल्याचे त्याला सिद्ध करायचे आहे. सुत्रांच्या माहितीनुसार धोनी आयपीएलमध्ये आपला फॉर्म आहे का हे पाहणार आहे. असे नसते तर त्याने यापूर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली असती.

भारताचा माजी कर्णधार धोनी हा आता 38 वर्षांचा झाला आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने भारताकडून एकही सामना खेळला नाही. सेमीफायनलमध्ये न्यूझिलंडच्या विरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात धोनीने 50 धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनी आऊट झाल्यानंतर संपूर्ण संघ ऑलआऊट झाला होता. त्यामुळे भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

महेंद्र सिंह धोनीने भारताला विश्वचषक आणि टी 20 चा विश्वचषक जिंकून दिला आहे. 2007 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धा भारताना जिंकली होती. तर 2011 मध्ये अंतिम सामन्यात षटकार लावून धोनीने भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी पुरस्कार जिंकला होता. आयसीसीचे तीन मोठे पुरस्कार जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे.