‘हा’ माजी सलामीवीर होणार ‘टीम इंडिया’चा बॅटींग कोच ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज निवड होत असून भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर याची या पदावरून हकालपट्टी होणे निश्चित झाले असून त्याच्या जागी नवीन खेळाडूची निवड करण्यात येणार आहे. यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची या पदावर वर्णी होणार असून संध्याकाळी याची घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी सल्लागार म्हणून देखील त्यांचे नाव मागील काही दिवसांपासून चर्चेत होते.

वर्ल्डकपमध्ये भारताच्या फलंदाजीच्या अपयशासाठी बांगर यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांची हकालपट्टी निश्चित आहे. विक्रम राठोड यांनी पंजाब आणि हिमाचल प्रदेश या संघाचे देखील त्यांनी याआधी प्रशिक्षकपद भूषविले आहे.

कोण आहेत विक्रम राठोड
बॅटिंग कोचच्या पदासाठी इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट, अमोल मुझूमदार, ऋषिकेश काणेटकर, प्रवीण आम्रे, लालचंद राजपूत, तिलन समरावीरा मार्क रामप्रकाश आणि विक्रम राठोड यांनी अर्ज केले आहे. यामध्ये विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी भारतासाठी ६ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळले असून त्यांना प्रथमश्रेणी सामन्यांचा खूप मोठा अनुभव आहे. ते २०१२ ते २०१६ या कालावधीत भारतीय निवड समितीचे सदस्य देखील होते.

आरोग्यविषयक वृत्त –