‘मास्टर ब्लास्टर’नं केलं खुप चांगलं काम, सचिननं केली 560 गरीब मुलांना ‘मदत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हटले जाते. हे साहजिक आहे, कारण मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने क्रिकेट विश्वात बरेच मोठे रेकॉर्ड केले आहेत. पण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या ७ वर्षानंतरही सचिनने मैदानाबाहेर आपली अशीच प्रतिमा कायम राखली आहे. अनेकदा दिसले आहे कि सचिन तेंडुलकर एखाद्या गरजूसाठी पुढे येतो. आता त्याने ५६० आर्थिक दुर्बल मुलांची देखभाल व शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

५६० गरीब आदिवासी मुलांना सचिन तेंडुलकरने केली मदत
महत्वाचे म्हणजे सचिन तेंडुलकरने एका स्वयंसेवी संस्थेसह (एनजीओ) आर्थिक दुर्बल असलेल्या ५६० आदिवासी मुलांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. सचिन तेंडुलकर स्वयंसेवी परिवार नावाच्या संस्थेशी हातमिळवणी करून हे उदात्त कार्य करत आहे. या एनजीओने मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्याच्या आसपास आणि दूरच्या खेड्यात सेवा कॉटेज बांधण्यासाठी चांगले काम केले आहे.

सचिन तेंडुलकरच्या या प्रशंसनीय पावलामुळे आणि संस्थेच्या मदतीने सिहोर जिल्ह्यातील बिलपती, सेवानिया, खापा, जामुनझील आणि नयापुरा या गावातील मुलांना शिक्षण व पौष्टिक आहार दिला जात आहे. ही मुले प्रामुख्याने आदिवासी समजल्या जाणाऱ्या बरेला भील आणि गोंड जमातीतील आहेत.

एनजीओने उघडले सचिनच्या महानतेचे रहस्य
वास्तविक एक माणूस म्हणून सचिन तेंडुलकर हे महान कार्य करत आहे. त्याने ही बातमी कोणालाही दिली नाही. पण ज्या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत तो हे कार्य करत आहे, त्यांनीच सचिन तेंडुलकरची महानता सांगितली आहे. एनजीओने म्हटले आहे की, कुपोषण आणि अशिक्षितपणासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जाणाऱ्या मध्य प्रदेशातील आदिवासी मुलांसाठी तेंडुलकरचे हे पाऊल त्याच्या चिंतेचा पुरावा आहे.

युनिसेफचे सदिच्छा दूत म्हणून सचिन तेंडुलकर मुलांच्या विकासासारख्या महत्त्वाच्या विषयांवर नियमित बोलत असतो. सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, त्याला क्रिकेटमध्ये देवाचा दर्जा का दिला जातो. कारण मैदानावरच्या विक्रमामुळे आणि त्याच्या बाहेरील व्यक्तिमत्त्वामुळे तो जगप्रसिद्ध आहे.