भारताचे माजी नौदलप्रमुख जयंत नाडकर्णी यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

भारताचे माजी नौदलप्रमुख अडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे सोमवारी (दि.२) कुलाब्यातील नैदलाच्या रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालायत त्यांच्यावर उपचार सुरु होते नाडकर्णी हे भारताचे १४ वे नौदल प्रमुख होते. डिसेंबर १९८७ ते १९९० असे तीन वर्ष त्यानी नौदलप्रमुख म्हमून धुरा सांभाळली होती.

[amazon_link asins=’B077CZPF34′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9693a800-7ea6-11e8-aa7d-1550391ff5cb’]

नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले. जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे. जयंत नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.३) दुपारी चार वाजता पुण्यातील गोळीबार मैदान येथे अंत्यसंस्कार करण्यात करण्यात येणार आहेत.