जामनेरचे माजी आमदार आबाजी पाटील यांचे निधन

जळगांव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याचे माजी आमदार आबाजी नाना पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. आबाजी पाटील हे ९४ वर्षाचे होते. त्यांचे मंगळवारी रात्री शहापूर, तालुका जामनेर या मूळगावी निधन झाले आहे.

आबाजी पाटील हे १९६२ मध्ये आमदार झाले. त्यानंतर ते सलग १० वर्षे त्यांनी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीत जामनेरला विज पुरवठ्यास सुरुवात झाली. ते जिल्हा लोकल बोर्डाचे ते सदस्य होते. स्वातंत्र्य सैनिक (स्व) राजमल लखीचंद ललवाणी यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले. जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे ते सलग ४० वर्षे अध्यक्ष होते. सहकारी तत्वावरील पहिल्या रम प्रकल्पाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य होते.