न्यायाधीशांच्या पत्नी, महिला वकील अन् कोर्टाच्या महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तन, बलात्काराची धमकी आणि लैंगिक टिप्पण्यांचा आरोप, माजी न्यायाधीशास अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सीएस कर्णन यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात, तमिळनाडू बार कौन्सिलच्या वतीने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सेवानिवृत्त न्यायाधीश सीएस कर्णन यांच्यावर न्यायाधीशांच्या पत्नी, महिला वकील आणि कोर्टाच्या महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्णनवर महिलांवर बलात्काराची धमकी आणि लैंगिक टिप्पण्या केल्याचा आरोप आहे.

27 ऑक्टोबर रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलांनी चेन्नई पोलिसांच्या सायबर सेल शाखेत तक्रार दाखल केली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या तक्रारीनंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांनी मुख्य न्यायाधीश शरद ए बोबडे (सीजेआय शरद ए बॉबडे) यांना पत्र लिहिले. या पत्रात वकिलांनी त्या व्हिडिओचा उल्लेख केला होता, ज्यात कर्णन महिलांबद्दल अश्लील टीका करीत आहेत, न्यायालयीन अधिकारी आणि न्यायाधीशांच्या पत्नींना लैंगिक हिंसाचाराची धमकी देत आहेत. या व्हिडिओमध्ये असेही दिसून आले आहे की, कर्णन सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर कोर्टाच्या महिला कर्मचार्‍यांशी लैंगिक हिंसाचाराचा आरोप करीत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी पीडितांची नावेही सांगितली आहेत.

नेहमीच वादात असलेले कर्णन यांचे कथित व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये कर्णन महिलांविषयी अश्लील टिप्पण्या देत आहेत. याचिकेमध्ये या व्हिडिओला शिक्षेचा पुरावा म्हणून मानण्यास सांगितले होते. बार कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, कर्णन न्यायालयीन यंत्रणेसाठी धोकादायक बनले आहे. विशेष बाब म्हणजे न्यायाधीश असूनही कर्णनला यापूर्वीच तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आधीच अटक झाली आहे

सुप्रीम कोर्टाने मे 2017 मध्ये कर्णनला 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. खास गोष्ट अशी की, जेव्हा कर्णनला शिक्षा झाली तेव्हा निवृत्तीनंतर अवघ्या 6 महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. आपल्या कारकिर्दीत बर्‍याचदा भ्रष्टाचाराचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनी प्रत्येक वेळी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दलित असल्यानेच त्यांना लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.