×
Homeताज्या बातम्याजुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन  

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्नर तालुक्याच्या माजी आमदार लतानानी श्रीकृष्ण तांबे (latanani tambe) (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सायंकाळी पुण्यात निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराजवळ मांडवी नदीतीरावर त्यांचा अंत्यविधी होणार आहे. १९७३ च्या जुन्नर विधानसभा पोटनिवडणुकीत त्या पहिल्या महिला आमदार (latanani tambe)  म्हणून निवडून आल्या होत्या.

स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रा. तांबे उर्फ झांबरशेठ यांच्या त्या पत्नी होत. ग्राम विकास मंडळ ओतूर तसेच श्री कपर्दिकेश्‍वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, निवृत्त बँक अधिकारी शशिकांत तांबे, संरक्षण विभागातून निवृत्त झालेले दीपक तांबे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे येथे कार्यरत असलेले किशोर तांबे यांच्या त्या मातोश्री होत.

जुन्नर पंचायत समितीवर त्या स्वीकृत सदस्य होत्या. त्यादरम्यान त्यांनी पुणे जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या निधनाने ओतूर गावावर शोककळा पसरली आहे.

 

Also Read This : 

 

हायकोर्टचे खासगी शाळांना वेबसाइटवर ‘बॅलन्सशीट’ अपलोड करण्याचे आदेश, म्हणाले – ‘नफेखोरीची दिली जाणार नाही परवानगी’

 

Watermelon Peel Benefits : कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही फेकू नका बाहेरचा भाग, दूर होऊ शकतात ‘या’ समस्या

 

Paytm आणतेय देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO, गुंतवणूकदारांना मोठी संधी

 

चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता

 

जाणून घ्या कोण-कोणत्या स्थितीत एक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्यासाठी ठरू शकते ‘लाभदायक’ !

 

 

उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News