माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांचे निधन

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांची तब्बेत खाल्यामुळे १० ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु आज (दि. १३) त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी समजता अनेत राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

सोमनाथ चटर्जी यांना गेल्या अनेक दिवसांपासून मुत्रपिंडाचा त्रास सुरू होता. त्यामुळे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते. यापूर्वी 28 जून रोजी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. सोमनाथ चटर्जी यांनी सीपीएम पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सन 1968 ते 2008 पर्यंत त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता ते नेता म्हणून सक्रियपणे कामकाज पाहिले. तर 1971 मध्ये पहिल्यांदा ते खासदार बनून संसदेत पोहोचले होते. तब्बल 10 वेळा ते खासदार राहिले आहेत.

[amazon_link asins=’B07F5YKHL2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7bcdb623-9ead-11e8-86ae-23917a16ef8d’]

दरम्यान, सन 2008 साली भारत-अमेरिका परमाणू करार विधेयकावेळी सीपीएमने तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग सरकारचे समर्थन काढून घेतले होते. त्यावेळी, सोमनाथ चटर्जी लोकसभा अध्यक्ष होते. यावेळी पक्षाने त्यांना अध्यक्षपद सोडण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे सीपीएमने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी केली होती.

सोमनाथ चटर्जी यांचा जन्म २५ जुलै १९२९ मध्ये तेजपूमध्ये एका सधन कुटुंबात झाला होता. सोमनाथ चटर्जी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट नव्हती, पण आईमुळे सबंध कुटुंबात ’साधी राहणी’ हे तत्त्व सहजपणे रुजले होते. त्यांचे वडील बंगाल हिंदू महासभेच अध्यक्ष होते, त्यामुळे घरात राजकारणाचा वारसा होता. वडील मानवाधिकाराच्या क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांच्याकडे राजकीय-सामाजिक क्षेत्रातले बरेच कार्यकर्ते येत्त. सिटूचे (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे) कार्यकर्तेही येत. त्यांच्यामुळेच सोमनाथ चटर्जी कन्युनिस्ट पक्षाकडे ओढले गेले.

सोमनाथ चटर्जी यांनी कलेक्टेड स्पीचेस ऑफ दी सोमनाथ चटर्जी (२०१२), किपींग दी फेथ : मेमरीज ऑफ पार्लमेटरीयन (२०१४) ही दोन पुस्तके लिहिलेली आहेत.