शिवसेनेला मोठा धक्का ! ‘कल्याण-डोंबिवली’चे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक देवळेकर यांचं निधन

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. देवळेकर यांच्या जाण्यामुळं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु ते त्यातून बरेही झाले होते. परंतु यादरम्यान त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वीच देवळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. देवळेकर यांची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली आहे. देवळेकर यांच्या जाण्यानं कल्याण डोंबिवलीत एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे. कोरोना संकटात काम करणाऱ्या अनेक नेत्यांना आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांना कोरोनानं वेढलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देश शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.