home page top 1

PMC बँक घोटाळा : माजी कार्यकारी संचालकानं दुसर्‍या पत्नीसोबत मिळून पुण्यातील पॉश परिसरात 9 फ्लॅट घेतल्याच उघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC) बँक घोटाळा प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असणाऱ्या माजी एमडी जॉय थॉमस याच्या संपत्तीचा आर्थिक गुन्हे शाखेला तपास लागला आहे. त्याने 2012 पासून कोंढवा आणि पुणे शहरात 9 फ्लॅट आणि 1 दुकान खरेदी केले होते. थॉमस याने ही मालमत्ता दुसऱ्या पत्नीच्या साथीने खरेदी केली होती.

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई अधिक तीव्र केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ( EW) या प्रकरणाची चौकशी केली असता असे दिसून आले की सर्व मालमत्ता 2012 नंतर खरेदी करण्यात आली आहे. हे त्याच वेळी घडले जेव्हा एचडीआयएल आरोपी राकेश आणि सारंग वाधवन यांनी कर्जाची परतफेड करणे थांबवले आणि अधिक रक्कम कर्ज घेत राहिले. या मालमत्तांच्या खरेदीचे उत्पन्नाचे स्रोत थॉमस आणि त्याची दुसरी पत्नी यांच्या मालकीची आहे. सध्या याविषयीची माहिती सविस्तरपणे गोळा केली जात आहे.

ठाण्यातही फ्लॅट आहे

एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की ही संपत्ती थॉमस व त्यांची दुसरी पत्नी यांच्या मालकीची आहे . या दहा मालमत्ता सोडून थॉमसकडेही ठाण्यात फ्लॅट आहे, जो पहिल्या पत्नीच्या मुलाच्या ताब्यात आहे.

असिस्टंटशी केले दुसरे लग्न

थॉमसने आपल्या असिस्टंटशीश लग्न केल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याचे कथित नाव जुनैद खान असे आहे. पुण्यातील बहुतेक मालमत्ता जुनैद आणि पत्नीच्या बदललेल्या नावाने खरेदी करण्यात आल्या आहेत. थॉमसच्या पहिल्या पत्नीने घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे, ज्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

2100 एकर जमीन जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एचडीआयएलच्या सुमारे 2100 एकर जागेची (किंमत सुमारे 3500 कोटी) एचडीआयएलचे अध्यक्ष राकेश वाधवन आणि त्याचा मुलगा सारंग वाधवन यांचे 60 कोटी रुपयांचे खासगी जेट व दागिने जप्त केले आहेत. ईडीने पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वरमसिंह यांची बँक खातीही गोठविली आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like