माजी मंत्री, माजी खासदार शंकर नम यांचे निधन

डहाणु : पोलीसनामा ऑनलाइन – आदिवासी समाजासाठी काम करणारे डहाणु विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार, खासदार व माजी मंत्री शंकर सखाराम नम Former MP Shankar Nam (वय ७२) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने शनिवारी सकाळी निधन झाले. शंकर नम यांची शुक्रवारी तब्येत बिघडल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले.

कोल्हापूर, सांगली, सातारासह 10 जिल्ह्यांचा तिसर्‍या टप्प्यात समावेश, ‘या’ पध्दतीची असणार नियमावली, जाणून घ्या

शंकर नम Former MP Shankar Nam हे तीन वेळा डहाणु विधानसभा मतदारसंघाचे आमदार, एक वेळा खासदार तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमंत्री होते. सुधाकार नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पाटबंधारे, खार जमीन, आदिवासी विकास आदि विभागाचे राज्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले.

COVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू

डहाणु तालुक्यातील तवा या आपल्या गावातील सरपंचापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. ते डहाणु पंचायत समिती सदस्य होते. ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर डहाणु विधानसभा मतदारसंघातून १९८५ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. सलग तीन वेळा ते आमदार होते. १९९८ मध्ये ते डहाणु लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अल्पवधीत कोसळल्याने ते ११ महिने खासदार राहू शकले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलं, मुलगी असा परिवार आहे. डहाणू तालुक्यातील तवा या मूळ गावी संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती