दगडाचं प्रत्युत्तर एके-47 नं कसं द्यायचं, हे मला माहीत

अलवर : वृत्तसंस्था – माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचा मुलगा आणि बहुजन समाज पार्टीचे नेते जगत सिंह यांनी ‘मला दगडाचं उत्तर एके-47 नं देता येतं. मोदी, गेहलोत आणि राजे यांनी यावं. सगळ्यांना पेटी पॅक करुन पाठवून देईन, असं वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर सध्या या विधानाचा व्हिडीओ वायरल झाला. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जगत सिंह यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रामगढ विधानसभेसाठी फेरनिवडणूक होत आहे. जगत सिंह यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्याचा व्हिडीओ सध्या वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ‘मी मागे हटणार नाही. गोळी झाडली गेली, तर पहिली गोळी मी माझ्या छातीवर झेलेन. दगडाचं प्रत्युत्तर एके-47 नं कसं द्यायचं, हे मला माहीत आहे. त्यामुळे या अशोकजी, या मोदीजी, या वसुंधराजी, सर्वांना पेटी पॅक करुन पाठवेन,’ असं जगत सिंह म्हणताना दिसत आहेत.

रामगढ विधानसभेचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांच्या मृत्यूनंतर निवडणूक स्थगित करण्यात आली. या ठिकाणी 28 जानेवारीला मतदान होणार असून 31 जानेवारीला मतमोजणी पार पडेल.

विशेष म्हणजे, जगत सिंग मागच्या वेळी भाजपकडून आमदार होते. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे दहा वर्षांपासून रामगढ येथे भाजप आमदार म्हणून काम करणारे जागरत सिंग यावेळी विधानसभा निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

https://support.twitter.com/articles/20175256