Pune : Covid-19 नियमांचे उल्लंघन ! माजी मंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलिसांची मध्यरात्री कारवाई, 22 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  माजी मंत्री रमेश बागवे यांच्या मुलाच्या हॉटेलवर कोंढवा पोलिसांनी(Kondhwa Police) मध्यरात्री कारवाई करत 22 जणांना पकडले आहे. त्यांना रात्री पकडल्यानंतर समजपत्र देऊन सोडले असल्याचे सांगण्यात आले आहे. कोव्हीड नियमांचे उल्लंघन करत त्यांनी हे हॉटेल सुरू ठेवत त्याठिकाणी ग्राहकांना बसून जेवण दिले असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई पोलिसांनी केली असल्याचे कोंढवा पोलिसांनी(Kondhwa Police) सांगितले आहे.

Lockdown in Maharashtra : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार पण…

याप्रकरणी माजी मंत्री रमेश बागवे यांचा मुलगा बाकीर रमेश बागवे (Baker Ramesh Bagwe), मॅनेजर प्रसाद प्रदीप शिंदे, कामगार शाहरुख फारुख शेख यांच्यासह 22 जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात भादवी कलम 188, 269, 270, सह राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम 2005 चे कलम 59(ब) तसेच साथीचे रोग प्रतिबंधक व महाराष्ट्र कोव्हीड 19  उपाय योजना 2020 चे कलम 11 नुसार  यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रोडवर एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ‘द व्हिलेज’ हॉटेल आहे. हे हॉटेल बाकीर रमेश बागवे यांचे आहे. दरम्यान पोलिसांना या हॉटेलमध्ये ग्राहकांना बसून जेवण दिले जात असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास याठिकाणी धाव घेत छापा टाकला. यावेळी येथे पोलिसांना मालक बाकीरसह 22 जण मिळून आले. यात काहीजण जेवण करताना दिसून आल्याने पोलिसांनी आदेशाचा भंग करत हॉटेल सुरू ठेवून संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल केला. बाकीर बागवे याच्यासह मॅनेजर, कामगार व जेवण करत असलेल्या ग्राहकांवर देखील पकडले. यानंतर रात्री उशिरा या सर्वांना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान. माजी मंत्र्याच्या मुलाच्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तसेच काहीजण पोलिसांच्या कारवाईचे कौतुक देखील करत आहेत.

केवळ इम्यूनिटी मजबूतच नव्हे तर केस गळती देखील थांबते पांढर्‍या कांद्याच्या सेवनामुळं, जाणून घ्या हैराण करणारे फायदे 

पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या

जेव्हा प्रेग्नंट नीना गुप्ताकडे नव्हते डिलिव्हरीसाठी पैसे, अकाऊंटमध्ये होते केवळ 2 हजार

Pune : दिव्यांग व्यक्तींचे पुण्यात भीक मागो आंदोलन