Former Minister Sanjay Rathod | ‘त्या’ महिलेच्या आरोपांबाबत पोलीस नोंदवणार आता माजी वनमंत्री संजय राठोड यांचा जबाब

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Former Minister Sanjay Rathod | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले महाविकास आघाडी सरकारमधील माजी वनमंत्री संजय राठोड (Former Minister Sanjay Rathod) आता आणखी एका कचाट्यात सापडताना दिसत आहेत. कारण, नुकतंच संजय राठोड यांच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले होते. त्या महिलेनं राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात (Ghatanji Police Station) पोस्टाने पाठवली होती. यावरून त्या महिलेचा जबाब नोंदवला गेला आहे. मात्र, आता संजय राठोड यांचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे. याप्रकरणी विशेष तपास पथके (SIT) स्थापन केली होती.

अधिक माहिती अशी, संजय राठोड (Sanjay Rathod) याचा जबाब उद्या (बुधवारी) नोंदवण्यात येणार आहे. SIT समिती पीडित महिला आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचा जबाब तपासून रिपोर्ट देणार आहे. यांनतर मीडियाला याप्रकरणी माहिती सांगण्यात येणार आहे. असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. दिलीप पाटील भुजबळ (SP Dr. Dilip Patil Bhujbal) यांनी म्हटलं आहे. तसेच, या महिलेच्या पत्राची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तातडीने विशेष चौकशी पथकाचे (SIT) तयार केले आहे. शुक्रवारी SIT ने जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वडिलांची प्रकृती बरोबर नाही. माझीही मनस्थिती बरोबर नाही, याबाबत निवेदन पोलिसांना दिलं. शेवटी 14 ऑगस्ट रोजी महिलेचा जबाब नोंदवला आणि या महिलेची बंददाराआड 2 चौकशी करण्यात आली आहे.

MNS | गेली 20 वर्षे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण पाहतोय; मनसेचा पलटवार

काय आहे प्रकरण?

पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शरीर सुखाची मागणी केली, असा गंभीर आरोप या महिलेने घाटंजी पोलीस ठाण्यात पाठविलेल्या तक्रारीत केला. ही तक्रार जिल्हा अधीक्षक कार्यालयापर्यंत पाठवण्यात आली. आणि कारवाई बाबत मार्गदर्शन मागण्यात आल्याची माहिती तेथील पीआय यांनी दिली.

दरम्यान, अधिक माहिती अशी की, माजी मंत्री संजय राठोड याच्या संस्थेवर तीन शिक्षक कार्यरत
होते. यावेळी गैरवर्तवणुकीमुळे त्या शिक्षकांना निलंबित केले होते. नंतर एका शिक्षकाच्या पत्नीने,
पतीला पूर्ववत कामावर घेण्यात यावे यासाठी धमकी दिली. यांनतर मोबाईलवर मेसेज ही पाठवले.
परंतु, तिच्या पतीला कामावर घेतले नाही. या प्रकरणात या महिलेने घाटंजी पोलिसांना (Ghatanji
Police Station) पोस्टाच्या माध्यमातून तक्रार पाठवून संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला.

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ‘चंद्रकांतदादा आपलं जितकं वय आहे, तितकी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे’ (व्हिडीओ)

Pimpri-Chinchwad Corporation | कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना PCMC देणार 10 हजारांऐवजी 25 हजारांची मदत

OBC Political Reservation | ओबीसी आरक्षणावरुन शरद पवारांनी केंद्रावर खापर फोडले नाही, फडणवीसांनी साधला राज्य सरकारवर निशाणा (व्हिडिओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Former Minister Sanjay Rathod | now shivsena leader sanjay rathores statement will be reported by the yavatmal police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update